आजची नारी आहे दुहेरी

बाहेरी व घरी सांभाळताना गंमत येते भारी ।
सतत धावपळ आणि घाई
पोटात अन्न ढकलायला ही वेळ नाही
सांभाळताना सर्व काही होते त्रेधातिरपीट
पण म्हणतात सर्व आजची नारी आहे धीट
घरी आणि दारी सगळीकडे त्रास स्वतंत्र असुन परावलंबी
कारण पुरुषप्रधान आहे समाज आणि मतलबी
देवू शकते ती मुलांना पैशाची उब
पण देवू शकत नाही सहवासाची उब
घरच्यांना हवी असते तिची संगत व सहवास
पण जावे लागते तिला बाहेर सोडून एक निश्वास
एवढे मात्र खरे की वाढली आहे पैशाची आवक
पुढच्या पिढीसाठी का ती मारक?
मुलांना हवी असते ती आणि तिचे असणे
बाहेरून घरी आल्यावर घरी तिचे दिसणे
पण हे खरे कि याचीही होते सर्वाना सवय
कारण परिवतर्न हाच जगाचा नियम
याला कोण करणार तरी काय?
कारणार तरी काय?

                                  श्रीमती शालिनी तालेवार